सातत्याने टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील मंत्र्यांना आणि आमदारांना लष्कराकडून पैसे देण्यात येत असल्याच्या विधानावरून माजी लष्करप्रमुख व्ही़ के. सिंग यांनी कोलांटउडी मारली आह़े  असा कोणताही प्रकार घडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल़े
अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत डेव्हिड मुल्फॉर्ड यांनी स्थर्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील ‘काही मंत्र्यां’ना लष्कराकडून पैसे मोजण्यात येत होते, असे विधान केले होत़े  त्या विधानाचा आपण केवळ मथितार्थ सांगण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा करीत सिंग यांनी या वादातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला़  ‘सद्भावना मिशनअंतर्गत काही मंत्री किंवा आमदारांना पैसे देण्यात येत होते, असे मी केव्हाही म्हटले नाही़  मी फक्त इतकेच म्हटले की, तेथे स्थर्य आणण्यात मदत मिळावी यासाठी काही योजना राबविण्यात येत आहेत़ ’ असे सिंग यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटल़े  याबाबत राज्य विधानसभेने पाठविलेल्या नोटिशीलाही आपण प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितल़े