scorecardresearch

नोबेल शांतता पुरस्कारासाठी पुतिन यांच्या नावाची शिफारस

सीरियावर अमेरिकेकडून होणारा क्षेपणास्त्र हल्ला थांबविण्यात आणि सीरियाला रासायनिक शस्त्रांच्या वापरापासून परावृत्त करण्यात महत्त्वाची

सीरियावर अमेरिकेकडून होणारा क्षेपणास्त्र हल्ला थांबविण्यात आणि सीरियाला रासायनिक शस्त्रांच्या वापरापासून परावृत्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल रशियातील एका समूहाने अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांच्या नावाची २०१४ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
सीरियाच्या प्रश्नावर राजकीय आणि राजनैतिक तोडगा काढण्यासाठी पुतिन यांनी घेतलेला सक्रिय सहभाग पाहता पुतिन हे नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी पात्र आहेत, असे ‘इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ स्पिरिच्युअल युनिटी अ‍ॅण्ड को-ऑपरेशन अमंग द नेशन्स ऑफ द वर्ल्ड’ या समूहाचे उपाध्यक्ष बेसलन कोबाजिया यांनी म्हटले आहे.तशी विनंती करणारे पत्र नोबेल पुरस्कार समितीकडे पाठविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-10-2013 at 12:44 IST

संबंधित बातम्या