मॉस्को : युक्रेनने २०२२ मध्ये त्यांच्या हद्दीत जोडलेल्या चार भागातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आणि नाटोमध्ये सामील होण्याची योजना सोडली तर रशिया युक्रेनमध्ये युद्धविराम करण्याचे आदेश देईल आणि वाटाघाटी सुरू करेल असे आश्वासन शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिले. असा प्रस्ताव कीवसाठी निरुपयोगी वाटतो कारण त्याला नाटो लष्करी आघाडीत सामील व्हायचे आहे. पुतीन यांच्या प्रस्तावावर युक्रेनकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, यापूर्वी युक्रेननेही रशियाने आपल्या सर्व भागातून त्यांचे सैन्य मागे घेण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> कोची विमानतळावर हृदयद्रावक स्थिती; ३१ भारतीयांचे मृतदेह पोहोचताच प्रियजनांचा शोक

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vladimir putin offers immediate ceasefire if ukraine abandons nato plans zws