जकार्ता : इंडोनेशियाच्या जावा या सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या बेटावरील सर्वात मोठय़ा ज्वालामुखीचा शनिवारी पुन्हा उद्रेक झाला. आसमंतात राखेचा प्रचंड धूर पसरल्याने नागरिक भयभीत झाले असून अद्याप कोणत्याही हानीचे वृत्त नाही. माऊंट सेमेरू असे या ज्वालामुखीचे नाव असून तो पूर्व जावाच्या लुमाजांग जिल्ह्यात आहे. त्याच्या आसपासच्या गावांतील घरांवर राखेचे थर जमा झाले आहेत. उद्रेक सुरू होताच वादळी पाऊसही सुरू झाला. लाव्हारस आणि पावसात तयार झालेला चिखल यांच्या रेटय़ाने येथील एक पूल नष्ट झाला. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Volcanic eruption in indonesia volcano on indonesia zws
First published on: 05-12-2021 at 01:16 IST