scorecardresearch

गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे.

गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

पीटीआय, अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात भाजप, काँग्रेस, ‘आप’ आदी पक्षांसह अन्य पक्ष आणि अपक्ष मिळून ८३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

गेल्या निवडणुकीत या टप्प्यातील ९३ पैकी भाजपने ५१, तर काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला ६३.३१ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाचा घसरलेला टक्का दुसऱ्या टप्प्यात वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गुजरातसह हिमाचल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आई हिराबा यांची गांधीनगरमधील निवासस्थानी भेट घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 01:29 IST

संबंधित बातम्या