scorecardresearch

“…म्हणून सर्वांनी कश्मीर फाइल्स चित्रपट पाहावा;” अमित शाहांनी सांगितलं कारण

अमित शाह यांनी या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक देखील केलं.

(Photo – Indian Express)

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचले. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. अनेक दिग्गज कलाकारांसह पंतप्रधान मोदी आणि राजकारण्यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा चित्रपट का बघावा, याबद्दल वक्तव्य केलं आहे.

अमित शाह म्हणाले की, “ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली होते हे त्यांना कळेल. जेव्हा तुम्ही नरेंद्र भाई (नरेंद्र मोदी) यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले तेव्हा त्यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवले. ज्या क्षणी नरेंद्रभाईंनी कलम हटवण्याचा निर्णय घेतला, त्या क्षणी देशभरातील लोकांना हे समजले की नरेंद्रभाईंसारख्या प्रबळ इच्छाशक्तीच्या नेत्याने देशाचे नेतृत्व केले तर काहीही अशक्य नाही.” अहमदाबाद महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी समुदायाला लक्ष्य केल्यानंतर काश्मिरी पंडितांना त्यांच्या मूळ राज्यातून जबरदस्तीने बाहेर काढण्याभोवती फिरते. या चित्रपटाला अनेक भाजपाशासित राज्यांनी करमुक्त केलंय,” असंही अमित शाह म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Watch kashmir files to know how terror gripped kashmir during congress rule says amit shah hrc

ताज्या बातम्या