scorecardresearch

अॅनाकोंडाने घेतला शेन वॉर्नच्या डोक्याचा चावा!

या अॅनाकोंडाच्या तोंडातील मागील बाजूस असलेल्या दातांमुळे तो चावल्यावर खूपच वेदना होतात

अॅनाकोंडाने घेतला शेन वॉर्नच्या डोक्याचा चावा!
शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला एका रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणादरम्यान अॅनाकोंडा चावल्याची घटना घडली. ‘गेट मी आऊट ऑफ हिअर’ या ऑस्ट्रेलियन रिअॅलिटी शोमध्ये शेन वॉर्न सहभागी झाला होता. त्यातील एका टास्कमदरम्यान काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या अॅनाकोंडाने त्याच्या डोक्याचा चावा घेतला. हा अॅनाकोंडा आकाराने लहान आणि बिनविषारी असला तरी तो अत्यंत आक्रमक असतो. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार , अॅनाकोंडाच्या जबड्यात पुढच्या बाजूला १०० दात असतात. त्याच्या दंशाचा प्रभाव शरीरावर टोचलेल्या १०० सुईंएवढा असतो. वॉर्नने लगेच तोंड बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
शेन वॉर्नला सापांची प्रचंड भिती वाटते, तरीही त्याने हा टास्क स्वीकारला. सुरुवातीला डोळ्याला पट्टी बांधलेल्या शेनने उंदीर असेलल्या बॉक्समध्ये डोकं घातलं. यानंतर त्याला अॅनाकोंडा असलेल्या बॉक्समध्ये काही वेळासाठी डोके ठेवायचे होते. पण उंदरांचा वास त्याच्या डोक्याला आणि त्वचेला येत असल्याने शेनचे डोके आपले भक्ष्य असल्याचा अॅनाकोंडाचा समज झाला. या बॉक्समध्ये अॅनाकोंडा, रॅट स्नेक आणि कॉर्न स्नेक होते. त्यापैकी एका छोट्या अॅनाकोंडाने शेनच्या डोक्यावर हल्ला केला. हा टास्क संपल्यानंतर शेन वॉर्नवर तातडीने उपचार करण्यात आले. त्याच्या डोक्यावर सापाने चावल्याची खुण आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे, असं चॅनल टेनच्या प्रवक्तांनी सांगितलं. दरम्यान, शेन वॉर्नला सापाने चावलेला हा एपिसोड आज रात्री ७.३० वाजता चॅनल टेनवर पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या