शरजील इमामने देशाबाबत केलेली वक्तव्यं कन्हैय्या कुमारने देशाबाबत केलेल्या वक्तव्यांपेक्षा घातक आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. शरजील इमामला आज दिल्ली पोलिसांनी जहानाबादमधून अटक केली. याबाबत बोलताना अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. आज दिल्ली पोलिसांनी शरजील इमामला अटक केली आहे. त्याला दिल्लीत आणलं जाईल आणि तुरुंगात धाडलं जाईल. मात्र त्याने देशाविरोधात केलेली वक्तव्यं अत्यंत घातक आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

आसाम भारतापासून स्वतंत्र करा असं वक्तव्य करुन शरजील इमामने देश तोडण्याचीच भाषा केली होती. २०१६ मध्ये कन्हैय्या कुमारने भारतीय लष्कराबाबत काही वादग्रस्त वक्तव्यं केली होती. ज्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. मात्र शरजील इमामने केलेली वक्तव्यं त्या वक्तव्यांपेक्षाही घातक आहेत असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

वादग्रस्त वक्तव्यं आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली आज शरजील इमामला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. पाटणा, मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी पोलिसांनी छापेही मारले. आज जहानाबादमधून शरजील इमामला अटक करण्यात आली. शरजील इमामवर भावना भडकवणारे भाषण दिल्याचा आरोप आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली पोलीस शरजील इमामचा शोध घेत आहेत. शनिवारी शरजील इमाम पाटणा येथील सब्जीबागच्या आंदोलनात सहभागी होणार होता. मात्र त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आल्याने तो या आंदोलनात सहभागी झाला नाही. आज त्याला अटक करण्यात आली आहे.

शरजील इमामचा व्हिडीओ एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याने केलेली वक्तव्यं ही कन्हैय्या कुमारपेक्षाही घातक आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.