US Army Attack Near Strait of Hormuz Video: मध्य पूर्व युद्धामुळे जवळपास बंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराण खाणकाम करत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने इराणवर जबरदस्त हल्ला केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या १६ इराणी जहाजांना नष्ट केल्याचा दावा, अमेरिकेने केला आहे. १० मार्च रोजी अमेरिकन सैन्याने केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
१६ इराणी जहाज नष्ट
‘तेल पुरवठा बंद करुन शत्रू राष्ट्राला एक लिटर तेल देखील मिळू देणार नाही, अशी धमकी तेहरानने दिल्यानंतर अमेरिकेच्या सैन्यांनी मंगळवारी सुरुंग पेरणारे १६ इराणी जहाज नष्ट केले’, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे. सोळाही इराणी नौका होर्मुझ सामुद्रधानीजवळ सुरुंग पेरण्याचे काम करत होत्या. येथून जगात २० टक्के तेलाची वाहतूक केली जाते. दरम्यान, पाण्यात इराणने स्फोटके पेरली नसल्याचे ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केले आहे.
अमेरिकेकडून हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध
अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. होर्मुझ सामुद्रधानी बंद करण्याचा प्रयत्न केल्यास २० पट जोरदार हल्ला करु, असा धमकीवजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. यानंतर अमेरिकेच्या सैन्याने ही कारवाई केली आहे.
अमेरिकाचा दावा आणि इशारा
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, इराणने होर्मुझच्या सामुद्रधानीच्या मार्गात सुरुंग पेरण्यास सुरुवात केली आहे. या मार्गातून जगात २० टक्के तेलाची वाहतूक केली जाते. अमेरिका – इस्त्रायलचा इराण विरुद्धचा संघर्ष तीव्र झाला असून, या लष्करी संघर्षाला ११ दिवस झाले आहेत. अमेरिकेने हल्ला अजून तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. संघर्ष थांबण्याचे अद्याप कोणतेही संकेत दिसत नसून, एकमेकांविरोधात धमकी सत्र सुरुच आहे.
हल्ल्यांचा नागरिकांना फटका
अमेरिका – इस्त्रायकडून होणाऱ्या हल्ल्याचा जोरदार फटका इराणी नागरिकांना बसला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. राजधानी तेहरानमध्ये इमारती, रस्ते उद्धवस्त झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. संघर्षावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी कोणी पुढाकर घेत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
