पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांच्या भाषणामध्ये श्रोत्यांनीच व्यत्यय आणल्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खैबर पख्तूनख्वा येथील विकास प्रकल्पांबद्दल एका कार्यक्रमामध्ये शरीफ बोलत असताना हा प्रकार घडला. सोमवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सर्वात आधी ‘पीटीव्ही’ न्यूजने दाखवला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून इतर अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखवला.

नवाज शरीफ विकास प्रकल्पांबद्दल बोलत असताना गर्दीमधील एकजण उठला आणि घोषणा देऊ लागला. या व्यक्तीला पाहून पाकिस्तानी पंतप्रधानांनी या व्यक्तीला उद्देशून, “चिंता करुन नका खाली बसा तुम्हाला लवकरच जेवण मिळेल,” असं म्हटलं. त्यानंतर पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पहायला मिळालं अन् ते पुढे भाषण करु लागले. पंतप्रधानांचं विधान ऐकून कार्यक्रमामधील सर्वच उपस्थित हसू लागले.

Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका
PM Narendra Modi
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित

वेगवेगळ्या विकासकामांच्या प्रकल्पांच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी शरीफ खैबर पख्तूनख्वा येथे गेले होते. यामध्ये रस्ते, वीज प्रकल्प आणि इतर मूलभूत सेवा देणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता अशी माहिती असोसिएट प्रेस ऑफ पाकिस्तानने दिली आहे. “आपल्यासमोर अनेक अडचणी येतील पण आपल्या देशातील लोकांनी त्याची चिंता करण्याची गरज नाही. सरकार या आव्हांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे,” असं शरीफ म्हणाले.

शरीफ यांनी प्रगती आणि विकास प्रकल्पांबद्दल सांगताना सरकार अजून जास्त माध्यमातून या दूर्गम भागांमधील विकास कामांना प्राधान्य देईल असा विश्वास व्यक्त केला.