शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज काँग्रेसच्या सरचटिणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या अगोदर काल संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील भेटले होते. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवाय, आज प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रया देताना मोठं विधान केलं आहे.

प्रियंका गांधींसोबत झालेल्या बैठीकाबाबत बोलताना संजय राऊत यांनी, “ही बैठक सकारात्मक होती. आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्याचा विचार करत आहोत” अशी माध्यमांना माहिती दिली आहे.

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तीन आघाड्या झाल्या तर….”

आगामी काळात उत्तर प्रदेश व गोवामध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता शिवसेनेकडूनही या निवडणुकांसाठी काँग्रेसशी हातमिळणी करण्याचे संकेत देण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.

तर, शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नाचं उत्तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून देणार असल्याचं काल सांगितलेलं आहे. शिवाय, विरोधकांची एकच आघाडी हवी असंही ते म्हणालेले आहेत.