scorecardresearch

“आम्हाला विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री पक्षपात करणार नाहीत आणि…”; अमित शाहांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचं विधान!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमवाद, शिवरायांबद्दलची वादग्रस्त वक्तव्ये आदींच्या तक्रारीसाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतली अमित शाह यांची भेट

“आम्हाला विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री पक्षपात करणार नाहीत आणि…”; अमित शाहांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचं विधान!
(संग्रहित छायाचित्र)

महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज(शुक्रवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत सध्या उफाळून आलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजाबाबत करण्यात आलेले विधान, याशिवाय भाजपा नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत तक्रार करण्यात आली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या सर्व घडामोडींचा माहिती आम्ही अमित शाह यांना दिली त्याची त्यांनी नोंद घेतली आणि माझा विश्वास आहे की यातून ते काहीतरी मार्ग काढतील. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की गुजरातच्या शपथविधी झाल्यानंतर ते काहीतरी मार्ग काढतील. त्यामुळे माझा विश्वास आहे की, याप्रकरणात लवकरात लवकर केंद्रचा हस्तक्षेप होईल.”

याशिवाय, “ आमचा विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री पक्षपात करणार नाहीत आणि राज्याच्या व देशाच्या हिताचं जे असेल, तसा निर्णय ते घेतील. अशी आमची एक त्यांच्याकडून प्रांजळ अपेक्षा आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात काय होतं हे पाहूयात.” असंही सुळे म्हणाल्या.
याचबोरबर, “ हे दुर्दैवी आहे की जेव्हा जेव्हा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला आपल्याला भेटायची संधी मिळते, तेव्हा ज्या राज्यातून आपण तेव्हा तिथेल प्रश्न मांडण्याची खूप मोठी संधी असते. त्यामुळे हे दुर्दैवं आहे की पंतप्रधानांना भेटायची जेव्हा संधी मिळाली, तेव्हा राज्याच्यावतीने कोणीच जर काही मांडलं नसेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे.” असंही त्यांनी म्हटलं.

“एक गोष्ट सातत्याने मी बघते आहे की, सत्तेत असलेले म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरू होऊन तीन दिवस झालेले आहेत. पण मला कोणीही सत्तेत असलेल्या लोकांनी या कुठल्याही विषयाबद्दल बोललेलं माझ्यातरी कानावर आलेलं नाही. हे दुर्दैवं आहे की जेव्हा महाराष्ट्राचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल याबद्दल अतिशय असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार हे ईडी सरकार वागतं आहे.” असा त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 15:38 IST

संबंधित बातम्या