२ ऑगस्टपासून राममंदिर प्रकरणी दररोज सुनावणी-सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

२ ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ५ न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राम मंदिर आणि बाबरी वादावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मध्यस्थ समिती ३१ जुलैपर्यंत काम करेल असंही कोर्टाने म्हटलं आहे.

अयोध्या आणि बाबरी वाद प्रकरणात मध्यस्थांच्या समितीने ३१ जुलैपर्यंत अहवाल द्यावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. हा अहवाल दिल्यानंतर २ ऑगस्टपासून दररोज सुनावणीला सुरुवात होईल असेही कोर्टाने म्हटले आहे. याआधी मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून ३१ जुलै करण्यात आली आहे. मध्यसस्थांच्या समितीकडून काय तोडगा निघतो तेेदेखील पाहू असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: We now fix the date of hearing on august 2nd we request the mediation committee to inform the outcome of the proceedings as of july 31st says supreme court scj