पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली रद्द झाल्यानंतर राजकारण तापले आहे. भारतीय किसान युनियन (क्रांतीकारी) प्रमुख सुरजित सिंग फूल यांनी सांगितले की, “फिरोजपूरच्या एसएसपी यांनी आम्हाला हे सांगून रस्ता मोकळा करण्यास सांगितले की, पंतप्रधान या रस्त्याने रॅलीच्या ठिकाणी जात आहेत. आम्हाला वाटलं की, आम्हाला फसवून भाजपा नेत्यांच्या बसेस तिथून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या मार्गाने पंतप्रधान येत आहेत हे आम्हाला खरेच माहीत नव्हते. रस्त्यावर बरीच वाहने होती.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच, “पंतप्रधानांना यायचं होतं तर तासाभर आधी कळालं असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, ते म्हणाले की भारतीय किसान यूनियनच्या नेत्यांनी ज्या प्रकारे पीएम मोदींच्या रॅलीजवळ मोगा-फिरोजपूर रस्ता रोखला आणि भाजपा नेत्यांना खचलेल्या रस्त्यावरून प्रवास करायला लावला, ते आमच्या कौतुकास पात्र आहेत. मी त्या सर्वांचे आभार मानतो.” असंही यावेळी सुरजितसिंग फूल यांनी बोलून दाखवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

“ केंद्र सरकार म्हणते की सुरक्षेत त्रुटी होती आणि पंजाब सरकार म्हणते की पंतप्रधान तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या रॅलीतील खुर्च्या रिकाम्या होत्या. दोघेही केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांनी तिथे जायला नको होते.” असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

“ … असं होतं तर मग ते तिथे गेलेच कशाला होते?” ; राकेश टिकैत यांचा मोदींवर निशाणा!

तसेच,“ अशाप्रकारची जी बातमी सुरू आहे की पंतप्रधान वाचले, सुखरूप परतले वैगेरे यावरून असं वाटतं की हा पूर्णपणे एक स्टंट आहे. मीडिया देखील म्हणत आहे की तिथून सुखरूप आले. मग असं होतं तर ते तिथे गेलेच कशाला? हा पूर्णपणे एक जनतेची सहानुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.” असा आरोपही राकेश टिकैत यांनी केला आहे.

मोठी बातमी! आंदोलकांनी रस्ता अडवल्याने मोदींचा ताफा अडकून पडला; रद्द करावी लागली सभा

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We thought he was bluffing bku krantikari chief surjit singh phool msr
First published on: 06-01-2022 at 16:13 IST