इशरत जहाँ ही गुजरात पोलिसांकडून बनावट चकमकीत ठार झाल्याच्या मुद्दय़ावरून गदारोळ माजलेला असतानाच ती दहशतवादी होती काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी येथे सूचित केले.
इशरत जहाँ ही दहशतवादी होती की नाही, असा प्रश्न विचारला असता, त्याची माहिती आपण घेत आहोत, असे शिंदे यांनी नमूद केले. गुजरात पोलीस, केंद्रीय गुप्तचर विभाग आणि गुप्तचर खाते यांच्यात या मुद्दय़ावरून मतभिन्नता असल्याचे मान्य करतानाच आम्हाला यासंदर्भात निश्चित माहिती मिळेल, असे ते म्हणाले.