ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने अनेक राज्यांनी वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमध्ये अनेक ठिकाणी विकेण्ड लॉकडाऊन म्हणजेच शनिवारी आणि रविवारी अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. असं असतानाच तामिळनाडूमध्ये याच विकेण्ड लॉकडाउनदरम्यान एक विचित्र प्रकार दिसून आला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार मंदिरं बंद असल्याने पुजाऱ्यांनी बंद मंदिरांबाहेर रस्त्यावरच लग्न लावून दिल्याचा प्रकार मागील दोन दिवसांमध्ये घडलाय.

तामिळनाडूमधील कुड्डलोर जिल्ह्यामधील एका प्रसिद्ध मंदिरासमोर रस्त्यावरच पुजाऱ्यांनी रविवारी काहीजणांची लग्न लावून दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून आठवड्यातून तीन दिवस मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र स्थानिक लोक मंदिरं बंद ठेवण्याच्या निर्णयामगील मूळ उद्देशालाच हरताळ फासताना दिसत आहेत. कुड्डालोर तिरवंतीपुरम श्री देवनाथस्वामी मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रविवारी जागेजागी लग्न लावून देण्यात आली.

mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
traffic congestion will affect industries in metros in future says union minister rajeev chandrasekhar
पुण्यासह इतर महानगरांसाठी धोक्याची घंटा! केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांचा इशारा
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
prabhas-london-house
‘या’ कारणासाठी आता प्रभास राहणार लंडनमध्ये भाड्याच्या घरात; भाड्याची रक्कम ऐकून व्हाल चकित

मंदिरांमध्ये लग्न लावून देणाऱ्या पुजाऱ्यांनी रस्त्यावरच हे विवाह लावून दिल्याचं पहायला मिळालं. रविवारी तामिळ कालगणनेनुसार थाई महिन्यामधील सर्वात पवित्र दिवस म्हणजेच ‘शुभ मुहूर्त नाल’चा दिवस होता. हा दिवसबरोबर रविवारी आल्याने मंदिरं बंद असतानाही अनेक जोडप्यांवर मंदिराबाहेर रस्त्यावरच लग्न करण्याची वेळ आली.

भगवान विष्णुला समर्पित करण्यात आलेल्या या मंदिरामध्ये लग्न करणं हे फारच शुभ मानलं जातं. त्यामुळेच या ठिकाणी लग्न करण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.

२३ जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये ३० हजार ५८० करोना रुग्ण आढळून आले. तामिळनाडूमध्ये रोज रात्री दहा ते पहाटे पाचदरम्यान नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आलीय. ९ जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये एका दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.