ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने अनेक राज्यांनी वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमध्ये अनेक ठिकाणी विकेण्ड लॉकडाऊन म्हणजेच शनिवारी आणि रविवारी अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. असं असतानाच तामिळनाडूमध्ये याच विकेण्ड लॉकडाउनदरम्यान एक विचित्र प्रकार दिसून आला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार मंदिरं बंद असल्याने पुजाऱ्यांनी बंद मंदिरांबाहेर रस्त्यावरच लग्न लावून दिल्याचा प्रकार मागील दोन दिवसांमध्ये घडलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तामिळनाडूमधील कुड्डलोर जिल्ह्यामधील एका प्रसिद्ध मंदिरासमोर रस्त्यावरच पुजाऱ्यांनी रविवारी काहीजणांची लग्न लावून दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून आठवड्यातून तीन दिवस मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र स्थानिक लोक मंदिरं बंद ठेवण्याच्या निर्णयामगील मूळ उद्देशालाच हरताळ फासताना दिसत आहेत. कुड्डालोर तिरवंतीपुरम श्री देवनाथस्वामी मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रविवारी जागेजागी लग्न लावून देण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weddings solemnised in front of closed tamil nadu temple during lockdown scsg
First published on: 24-01-2022 at 09:22 IST