पश्चिम बंगालमधून ७३ किलो गांजा जप्त, आरोपी अटकेत

गेल्या दहा दिवसातील ही दुसरी घटना आहे.

पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथून रेल्वे पोलिसांनी रविवारी रात्री ७३ किलो गांजा जप्त केला. या बरोबरच एका आरोपीला अटक करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. गेल्या दहा दिवसातील ही दुसरी घटना आहे. सिलिगुडी पोलिसांनी एकूण २३ पाकिटे जप्त केली. त्याचे वजन सुमारे ७३ किलो असून यासह दोन कंटेनर (डबे) भरून गांजा जप्त करण्यात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्याच आठवड्यात १६ सप्टेंबरला याच परिसरात पोलिसांनी तब्बल १० लाख किंमतीचा सुमारे २०० किलो वजनाचा गांजा जप्त केला होता.

दरम्यान, एप्रिल महिन्यात कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाच्या अपर पोलिस आयुक्तांनी नेमलेल्या पथकाने तपासणी दरम्यान २०७ किलो गांजा जप्त केला होता. ठाणे, कल्याण, भिवंडी यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विक्रीचे जाळे विणले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार कारवाई करण्यात आली होती.

अशा प्रकारे विविध राज्यांच्या मोठ्या शहरांमध्ये गांजाची तस्करी वाढल्याचे दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: West bengal 1 person has been arrested by railway police around 73 kgs of cannabis seized at siliguri