West Bengal assembly election results 2026 BJP Leding: पश्चिम बंगालमधील सुरुवातीच्या कलमध्ये भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतली आहे. आज सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच हे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका २३ एप्रिल आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांत पार पडल्या होत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचे निकाल आता जाहीर होऊ लागले आहेत.
टीएमसी आणि भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा यांनी ही निवडणूक संयुक्तपणे लढवली. तृणमूल काँग्रेसने २९१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर बीजीपीएमने (BGPM) तीन जागांवर उमेदवार दिले होते. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात ९२.८८% मतदानाची नोंद झाली, तर दुसऱ्या टप्प्यात ९२.५% इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती.
भाजपाचा ऐतिहासिक विजय
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपाने २०२ जागांवर विजय मिळवला असून त्यांना एकूण ४५.८% मते प्राप्त झाली. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत २०२१ मधील ४८% वरून या निवडणुकीत ४०.८% पर्यंत घसरण झाली. त्यांच्या वाट्याला ८१ जागा आल्या. तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या.
| पक्ष | विजयी | मतांची टक्केवारी |
| भारतीय जनता पार्टी | २०७ | ४५.८४ |
| तृणमूल काँग्रेस | ८२ | ४०.८० |
| काँग्रेस | २ | २.९७ |
२०२१ मधील निकाल काय होते?
२०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत, टीएमसीने (TMC) २९४ पैकी २१५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. २०१६ मध्ये केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जागांची संख्या वाढून ७७ वर पोहोचली होती. २०२१ च्या निवडणुकीत डाव्या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाव्हती, तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती.
| पक्ष | विजयी जागा | जागा मतांची टक्केवारी |
| तृणमूल काँग्रेस | २१५ | ४८.५ |
| भारतीय जनता पार्टी | ७७ | ३८.४ |
| आरएसएमपीए | १ | १.४ |
| अपक्ष | १ | १.६ |
मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच, भारतीय जनता पार्टीचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी असा विश्वास व्यक्त केला होता की, हिंदू मतांच्या भक्कम एकत्रीकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये पुढील सरकार भाजपाच स्थापन करेल.
“या वेळी हिंदू मतांचे एकत्रीकरण झाले आहे. ज्या प्रकारे मुस्लिम मतदार यापूर्वी तृणमूल काँग्रेसला मतदान करत असत, तसे त्यांनी या वेळी केलेले नाही. काही मते मुस्लिम-धार्जिण्या पक्षाकडे वळली आहेत. भाजपालाही काही प्रमाणात, अगदी थोडी का होईना, मते मिळाली आहेत. नंदीग्राममधील मुस्लिमबहुल मतदान केंद्रांवर (बूथवर) भाजपाची कामगिरी इतकी चांगली होईल, अशी मला अपेक्षा नव्हती.” असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री पदाचे सांभाव्य उमेदवार असलेल्या अधिकारी यांनी म्हटले.
