पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने त्यांना दिलेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी मंगळवारी पद्मभूषण पुरस्कार नाकारला आहे. हा भट्टाचार्य आणि पक्षाचा निर्णय आहे, असे सीपीआय(एम)ने म्हटले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे माजी सदस्य, बुद्धदेव भट्टाचार्जी हे २००२ ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. “मला पद्मभूषण पुरस्काराबद्दल काहीही माहिती नाही, मला कोणीही त्याबद्दल सांगितले नाही. मला पद्मभूषण पुरस्कार मिळाला असता तर मी तो नाकारला असता,” असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस का म्हणाले, मी पुन्हा येईन…
Himachal Pradesh Speaker disqualifies 6 Congress MLAs
हिमाचलमध्ये राजकीय उलथापालथ चालूच! काँग्रेसचे ‘ते’ सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; कारण काय?
CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ajit pawar
फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला अजितदादांचा बूस्ट

प्रजासत्ताक दिनी, ज्या लोकांनी आपल्या क्षेत्रात देशाला अभिमानास्पद कामगिरी केली आहे त्यांना सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यामध्ये पद्मविभूषण पुरस्कारासाठी चार नावांची निवड करण्यात आली आहे. देशाच्या रक्षणासाठी अनेकवेळा साहस दाखवणारे जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ते देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते.

पद्म पुरस्कारांच्या यादीत बुद्धदेव यांच्यासोबत गुलाम नबी आझाद यांच्या नावाचाही समावेश आहे. यासोबतच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, बंगालच्या प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जीचाही पद्मश्री विजेत्यांच्या यादीत समावेश आहे. संध्या मुखर्जी यांनीही हा सन्मान घेण्यास नकार दिला आहे. याला त्यांनी आपली बदनामी म्हटले. संध्या मुखर्जी यांच्या एका कौटुंबिक मैत्रिणीने सांगितले की, मंगळवारी दुपारी केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांनी तिला याबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.

९० वर्षीय गायिका संध्या मुखर्जी या दक्षिण कोलकाता येथील लेक गार्डन परिसरात राहतात. संध्या मुखर्जीने बंगाली चित्रपटांमध्ये हजारो गाणी गायली आहेत आणि त्या त्यांच्या आधुनिक आणि अर्ध-शास्त्रीय संगीत अल्बमसाठी देखील ओळखल्या जातात. प्रसिद्ध गायक हेमंत मुखर्जी यांच्यासोबत गायलेली त्यांची गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. हेमंत कुमार यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील ओळखही खूप मोठी आहे आणि त्यांच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे.