West Bengal Coal Scam: केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) कथित कोळसा घोटाळा प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कायदा मंत्री मलय घटक यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापेमारी केली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्यात चार ठिकाणी तर आसनसोलमधील एका ठिकाणावर ही कारवाई करण्यात आली आहे.

शाहांच्या ‘जमीन दाखवण्याची वेळ आलीय’ टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “ती जमीन दाखवल्यानंतर…”; दोन शब्दांत शिंदे गटालाही टोला

कोळसा घोटाळाप्रकरणी २० सप्टेंबर २०१२ रोजी सीबीआयकडून खटला दाखल करण्यात आला होता. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार सीबीआयने ‘ग्रेस’ या कंपनीचे संचालक मुकेश गुप्ता यांच्याविरोधात २८ ऑक्टोबर २०१४ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. याच प्रकरणात आता मलय घटक सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत.

१० कोटींचा व्हिला, पाच हजार गाड्या आणि तीन बायका; विमानाने प्रवास करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या चोराला अटक

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची दिल्लीतील कोळसा चोरी प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्यानंतर तृणमुल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी क्रमांक दोनचे प्रभावी नेते मानले जातात. या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा नरुला आणि त्यांच्या बहिणीची देखील तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात अमित शाहांनी मला तुरुंगात डांबून दाखवावे, असे आव्हान अभिषेक बॅनर्जी यांनी ईडी चौकशीनंतर केले होते. दरम्यान, पश्चिम बंगालमधील गोवंश तस्कीर प्रकरणाचा तपास देखील सीबीआयकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी तृणमूलचे अनुब्रता मंडल यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.