Video : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं नेमकं चुकलं कुठे? पाहा गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण!

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता दीदींनाच मतदारांनी आपला कौल दिला आहे!

west bengal Assembly Election Results 2021

देशात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाच राज्यांच्या निवडणुकांची मोठी चर्चा सुरू होती. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या ठिकाणी विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज लागले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून केरळमध्ये देखील पुन्हा डाव्यांचीच सत्ता आली आहे. तामिळनाडूमध्ये मात्र सत्तापालट झाला आहे. दुसरीकडे आसाम या छोट्या राज्यात आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजपाला सत्ता राखण्यात यश आलं आहे. ऐन करोनाच्या संकटकाळात देखील जाहीर सभा आणि प्रचार झालेल्या या निवडणुकांत भाजपाला मात्र अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही.

या पार्श्वभूमीवर नेमका या पाच राज्यांच्या निवडणुकांचा काय अर्थ आणि अन्वयार्थ आहे? त्याचे देशाच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतील? पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं नेमकं चुकलं कुठे? यावर चर्चा सुरू झाली आहे. याचसंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West bengal election result tms mamata banerjee won bjp lost girish kuber analysis pmw

ताज्या बातम्या