West Bengal Exit Poll 2026: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हातातून सत्ता निसटणार (?) असा अंदाज बुधवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. आता गुरुवारी जाहीर झालेल्या ‘टुडेज चाणक्य’च्या एक्झिट पोलनुसार, राज्यातील नाट्यमय बदलाचे संकेत दिसत आहेत. ‘चाणक्य’च्या अंदाजानुसार, भाजपला १९२+ जागांसह स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता आहे, तर तृणमूल काँग्रेसला (TMC) १००+ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१४८ बहुमताची संख्या
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान संपन्न झाले. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण २९४ जागा असून बहुमताची संख्या १४८ इतकी आहे. २०२१ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने २१३ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर भाजपाला ७७ जागांवर विजय मिळाला होता. बुधवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.
दोन टप्प्यांत मतदान
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही बहुतेक एक्झिट पोलनी भाजप आणि टीएमसीमध्ये अटीतटीच्या लढतीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्ष निकाल पूर्णपणे वेगळा लागला आणि टीएमसीने २१५ जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले. केंद्रीय दलाचे जवान बंगालमध्ये मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. काहीशा तणावपूर्ण वातावरणात बंगालमध्ये ९० टक्क्यांहून अधिक विक्रमी मतदान नोंदवले गेले.
एक्झिट पोलचे अंदाज काय आहेत?
पीपल पल्स
तृणमूल काँग्रेस (TMC) : 177-187
भाजपा (BJP) : 95-110
काँग्रेस : 1-3
डावी आघाडी : 0-1
इतर : 1-2
मॅट्रिझ
तृणमूल काँग्रेस (TMC) : 125-140
भाजपा (BJP) : 146-161
काँग्रेस :
डावी आघाडी :
इतर : 6-10
पी – मार्क
तृणमूल काँग्रेस (TMC) : 118-138
भाजपा (BJP) : 150-175
काँग्रेस :
डावी आघाडी :
इतर : 2-6
पोल डायरी
तृणमूल काँग्रेस (TMC) : 130-140
भाजपा (BJP) : 150-160
काँग्रेस : –
डावी आघाडी : –
इतर : 6-10
