पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सोमवारी सियालदहला जाणाऱ्या कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक लागल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात १५ जण ठार झाले तर ६० जण जखमी झाले. रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातानंतर एका प्रवाशांनी अपघातावेळी नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा – Air India च्या विमानात दिलेल्या जेवणात आढळलं ब्लेड; प्रवाशानं सोशल मीडियावर शेअर केले…

Kerala cop hits drives off with petrol pump staffer on bonnet after being asked to pay for fuel
पेट्रोलचे पैसे मागितले म्हणून पोलिस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी; बोनेटवरून नेले फरफटत, Video Viral
passenger arrested with cannabis brought from bangkok at mumbai airport
बँकॉकहून आणलेल्या गांजासह प्रवाशाला अटक; दोन दिवसांत साडेचार कोटी रुपयांचा गांजा जप्त
pune man petrol on traffic police marathi news
धक्कादायक! दुचाकी अडवल्याचा राग आल्याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
Ayodhya Women Falls In Pothole Viral Video
अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
lpg cylinder caught fire in mauli palkhi ceremony
माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात
kalyan, Feeding Stray Dogs, Dog Loving Woman Threatened in kalyan, Dog Loving Woman Threatened with Death , Feeding Stray Dogs in kalyan, kalyan news, marathi news,
कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी
The passengers chased the wallet thief and caught him Mumbai
मुंबई: प्रवाशांनी पाकीट चोराला पाठलाग करून पकडले
Wedding Honeymoon Night Turned Nightmare
मधुचंद्राच्या रात्रीला भयंकर वळण! नवरीच्या ‘या’ आरोग्य स्थितीने नवऱ्याला बसला धक्का, डॉक्टरांकडून ऐका कहाणी व उपाय

या अपघातानंतर कंचनजंगा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने एनएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. यात त्याने अपघातावेळी नेमकं काय घडलं, हे सांगितलं आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मी बी १ कोचमध्ये होतो. आमच्या बोगीला अचानक जोरदार धक्का बसला. त्यानंतर सगळे जण अपघात झाला म्हणून ओरडत होते. काही जण रडायला लागले. मी बाहेर येऊन बघितलं तर मालगाडीने आमच्या एक्सप्रेसला धडक दिली होती, अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली. पुढे बोलताना या अपघातामुळे आमच्या बोगीत अनेक जण जखमी झाले. तसेच काही लोकांचा मृत्यूदेखील झाला. यावेळी माझ्या डोक्यालाही मार लागला, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एनडीआरएफच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर लगेच बचावकार्य सुरु करण्यात आले. काही वेळातच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवदेखील घटनास्थळी पोहोचले. याठिकाणी पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूर केली. यावेळी माध्यमांशी बोलताना, मृतकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच जे लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना अडीच लाख रुपये तर जे किरकोळ जखमी आहेत, त्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – मानवी चूक! पश्चिम बंगालमधील भीषण कंचनजंगा रेल्वे अपघातातील प्राथमिक कारण समोर, “मालगाडीच्या चालकाने…”

या अपघातासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालमध्ये झालेला रेल्वेचा अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात ज्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे लोक जखमी झालेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुक्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. या घटनेचे वृत्त ऐकून धक्का बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार कंचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने धडक दिली आहे. ही घटना अतिशयदुर्देवी आहे, असे त्या म्हणाल्या.