What is an Exit Poll: सध्या देशभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची. लोकसभा निवडणुकीचं सहा टप्प्यातील मतदान पार पडलं असून १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर केंद्रात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. २३ मे रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

Exit Poll: …या तीन निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकला

एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो ?
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो. त्यानुसार यावेळी १९ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता एक्झिट पोल जाहीर केला जाईल.

कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल ?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.

Exit Poll : एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक ?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.

ओपनियन पोलवर कितपत निर्भर राहू शकतो ?
एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.

एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली ?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.