पियूष धनोतियाने त्याच्या २५ वर्षीय प्रेयसीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. पियूषला पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पियूष हा इंदूरचा आहे. पियूषला त्याने जे काही केलं त्याचा मुळीच पश्चाताप झालेला नाही. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्याने माध्यमांसमोर जाताना चेहरा लपवला नाही. उलट थंड चेहऱ्याने उत्तर दिलं ज्याची चर्चा होते आहे.

काय म्हणाला पियूष धनोतिया?

पियूष पोलिसांच्या गराड्यात होता. त्याच्यावर कॅमेरे रोखले गेले होते. त्याने चेहरा लपवला नाही.त्याचा आवाजही हळू येत नव्हता. त्याच्यासमोर जेव्हा माध्यमांचे माईक आले तेव्हा तो म्हणाला, “जे काही घडायचं होतं ते घडून गेलंय. सोडून द्या. काय घडलं हे माहीत करुन तुम्ही काय करणार आहात? वेळ येईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी सांगेन.” असं पियूषने थंड चेहऱ्याने सांगितलं आहे.

पियूषने केली त्याच्या प्रेयसीची हत्या

पियूष धनोतियाने त्याच्या २५ वर्षांच्या प्रेयसीची हत्या केली. त्याआधी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावरही लैंगिक अत्याचार केले. ही घटना मध्य प्रदेशातल्या पियूषच्या घरात घडली आहे. तो इंदूर या ठिकाणी भाडे तत्त्वावर एका घरात वास्तव्य करत होता. त्याची प्रेयसी एमबीए करत होती. ती त्याला भेटायला आली होती. त्यावेळी तिच्यापासून सुटका हवी म्हणून पियूषने तिची हत्या केली आणि त्याआधी तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावरही लैंगिक अत्याचार केले.

१० फेब्रुवारीला नेमकं काय घडलं?

१० फेब्रुवारीला पियूषने त्याच्या प्रेयसीला घरी बोलवलं. साधारण दुपारी ३.३० च्या सुमारास पियूषची प्रेयसी त्याच्या घरी पोहचली. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला. राग अनावर झालेल्या पियूषने त्याच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिचे फोटो पियूषने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले. त्यानंतर तो फरार झाला. इकडे सदर मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या घरातल्यांनी तिचा शोध सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली आणि त्याला मुंबईतल्या अंधेरी भागातून अटक केली.

पियूषला मुंबईतून पोलिसांनी केली अटक

पियूषच्या प्रेयसीच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी जेव्हा कसून शोध सुरु केला तेव्हा तिचा मृतदेह पियूषच्या भाडे तत्त्वावरच्या घरात निर्वस्त्र आणि सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पियूषने तिची हत्या केली. हत्येच्या आधी तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिच्या मृतदेहावरही लैंगिक अत्याचार केले. हे सगळं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केल्यावर तो मुंबईला पळाला होता. पण पोलिसांनी त्याला मुंबईतल्या अंधेरीतून अटक केली.