भारतात जवळपास ५५ कोटी नागरिक व्हॉटअ‍ॅपचा वापर करतात. अन्य कंपन्यांप्रमाणे व्हॉटअ‍ॅप सोशल मीडिया अ‍ॅपही नव्या आयटी नियमाअंतर्गत येते. या कायद्यानुसार भारतातील सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला यूजर्स सेफ्टी रिपोर्ट सरकारला द्यावा लागतो. व्हॉटअ‍ॅपने दाखल केलेल्या रिपोर्टमध्ये जून-जुलै दरम्यान ३० लाखाहून अधिक अकॉउंटवर कारवाई केल्याचं समोर आलं आहे.

ऑनलाइन स्पॅम आणि गैरवर्तनाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. फॉरवर्ड मेसेजेससाठी अ‍ॅपच्या गैरवापरसह विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अकॉउंटवर कारवाई करण्यात आली आहे. जूनपासून जुलैपर्यंत जवळपास ३० लाख २७ हजार अकॉउंट बंद केली आहेत. या अकॉउंटबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ऑटोमॅटिक टूलद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत ३१६ खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. युजर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर ७३ खात्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. ४६ दिवसात युजर्सकडून ५९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ३१६ अकॉउंटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव इतर अकॉउंटच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

अन् धरणातून ढगात गेलं पाणी, पाहा व्हिडिओ

“व्हॉट्सअ‍ॅप मीडिया प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तन शोधण्यासाठी ऑटोमॅटिक टूल आहे. जर तुम्हालाही कोणत्या अकाँउंटबाबत तक्रार असेल तर wa@support.whatsapp.com या ईमेलवर मेल करू शकता किंवा अ‍ॅपमधूनच खाते ब्लॉक करू शकता अन्यथा तक्रार करू शकता”, असं व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं आहे.

Semiconductor crisis: मारुतिचं उत्पादन चिप शॉर्टेजमुळे अर्ध्यावर

दुसरीकडे फेसबुकनेही नव्या आयटी कायद्यानुसार ३३.३ दशलक्ष कंटेंटवर कारवाई केली आहे. ही कारवाई १६ जूनपासून ३१ जुलै या दरम्यान करण्यात आली आहे. तर इन्स्टाग्रामने २.८ दशलक्ष अकॉउंटवर कारवाई केली आहे.