सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झालं आहे. यामुळे वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे.

वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही अ‍ॅप चालत नाहीत. अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर तिन्ही अ‍ॅप ठप्प आहेत. लोकांनी पाठवलेले मॅसेज अर्ध्यावरच अडकले आहेत. डाउन डिटेक्टरवर लोकांनी याबाबतच्या तक्रारी दिल्या आहेत. भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअ‍ॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
pune, young engineer girl , overcomes a rare disorder, Treatment of Gartner, Duct Cyst, Marsupialization Procedure, rare disease to girl, rare disease pune, doctor, pune news, marathi news,
अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ट्वीटरवर मॅसेज पोस्ट करत व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक बंद असल्याची माहिती दिली आहे. रात्री ९ वाजल्यापासून अडचण येत असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर ट्वीटरवर मीम्सचा पाऊस पडला आहे. वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन असल्याने ट्वीटरवर पोस्ट करत आहेत.

व्हॉट्सअपसारखे अ‍ॅप्स ठप्प होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी मार्च २०२१ मध्ये असाच एरर आला होता.