व्हॉटसअ‍ॅपने भारतीय वापरकर्त्यांना मेसेजिंग अ‍ॅपच्या बनावट आवृत्त्यांपासून सावध राहण्याचा कडक इशारा दिला आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपचे सीईओ, विल कॅथकार्ट यांनी ट्वीट करत व्हॉट्सअ‍ॅपची सुधारित आवृत्ती न वापरण्याची विनंती केली आहे.

व्हॉटसअ‍ॅप कंपनीच्या सिक्युरिटी रिसर्च टीमला काही बनावट अ‍ॅप सापडले आहेत ज्या व्हॉटसअ‍ॅपच्या सीईओंचा भारतीय ग्राहकांना इशारा सारख्याच सेवा देण्याचा दावा करतात. “HeyMods” नावाच्या डेव्हलपरचे “Hey WhatsApp” सारखे अ‍ॅप धोकादायक आहेत आणि लोकांनी ते डाउनलोड करणे टाळावे. या बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून तुमची व्यक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका असल्याचेही व्हॉटसअ‍ॅपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा- ‘मी भारत भेटी दरम्यान गोळा केलेली माहिती आयएसआयला पुरवली, मात्र..’; मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी लेखकाचा दावा

हेही वाचा- “फक्त देवच अशा वकिलांपासून वाचवू शकतो,” युक्तिवाद ऐकल्यानंतर केरळ हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी नोंदवलं निरीक्षण

व्हॉटसअ‍ॅपच्या सुधारित किंवा बनावट आवृत्त्या व्हॉटसअ‍ॅपसारखीच सेवा देतात. पण व्हॉटसअ‍ॅपची मूळ आवृत्ती तुमच्या व्यक्तिक माहितीचे संरक्षण करते. मात्र, हे व्हॉटसअ‍ॅप सारखे अ‍ॅप तुमच्या व्यक्तीक माहितीचे संरक्षण करण्यापेक्षा त्याचा गैरवापर करु शकते अशी भीती व्हॉटसअ‍ॅपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी व्यक्त केली आहे. व्हॉटसअ‍ॅपची नवीन बनावट आवृत्ती प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही, परंतु जे वापरकर्ते अनाधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून व्हॉटसअ‍ॅप डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या अगोदर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तसेच कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा गुगल प्ले सारख्या विश्वसनीय अ‍ॅप स्टोरद्वारेच व्हॉटसअ‍ॅपची अधिकृत आवृत्ती डाउनलोड करावी, असा सल्लाही कॅथकार्ट यांनी दिला आहे.