scorecardresearch

आता WhatsApp वर दिसणार भारतीय रुपयाचं चिन्ह; व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्समध्ये झालं आणखी सोपं

एक नवं जबरदस्त फिचर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स आहे.

आता WhatsApp वर दिसणार भारतीय रुपयाचं चिन्ह; व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्समध्ये झालं आणखी सोपं
आता WhatsApp वर दिसणार भारतीय रुपयाचं चिन्ह (Photo : Indian Express)

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) अनेक नवीन अपडेट्स जारी केली आहेत. या अपडेट्समार्फत, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्सना अनेक नवीन फीचर्स दिली आहेत. ही फीचर्स लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहेत. त्यापैकी एक नवं जबरदस्त फिचर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स (WhatsApp Payments) आहे. या फीचरद्वारे, आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अगदी सहज पैसे पाठवू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फीचर

व्हॉट्सअ‍ॅपच्या अलीकडील अपडेटनंतर आता एक नवीन फिचर आलं आहे. ज्याद्वारे आपण आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना त्यांच्याशी गप्पा मारता मारता तितक्याच सोप्या मार्गाने पैसे देखील पाठवू शकतो आणि रिसिव्ह देखील करू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं पेमेंट फिचर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर कार्य करतं.

‘₹’ चिन्हाचा समावेश

व्हॉट्सअ‍ॅपची कंपनी असलेल्या फेसबुकने आपल्या भारतीय युझर्ससाठी एक खास अपडेट जारी केलं आहे. हा बदल व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स फीचरशी संबंधित आहे. कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (GFF) २०२१ मध्ये जाहीर केलं आहे की, आतापासून सर्व व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या चॅट बॉक्समध्ये ‘₹’ हे भारतीय रुपयाचं चिन्ह समाविष्ट केलं जाईल. ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फीचर वापरणं सोपे होईल.

नव्या अपडेटनंतर फीचर झालं आणखीच सोपं

फेसबुकने अशी माहिती देखील माहिती जारी केली आहे की, “व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट बॉक्समधील जो कॅमेरा आयकॉन आहे तो वापरून युझर्सना भारतातील २ कोटींहून अधिक स्टोअरमध्ये कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून हे फिचर वापरता येणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स फीचर फेज वाइज रिलीज केलं होतं. तर आता या नवीन अपडेटनंतर हे फीचर वापरणं आणखीच सोपं होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Whatsapp payments added indian rupee symbol gst

ताज्या बातम्या