“तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते” इंधन दरवाढीवरुन राहुल गांधींची टीका

मे महिन्यानंतर ३६ वेळा पेट्रोलच्या किंमतीत तर डिझेलच्या किंमतीमध्ये ३४ वेळा वाढ झाली आहे

Whether your car runs on petrol or diesel Modi government runs on tax collection Rahul Gandhi taunts the Center on rising oil prices
गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेस पक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर ‘आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या’. दिल्लीत पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८९.५३ रुपयांवर पोहोचले आहे’ अशी बातमी शेअर केली आहे.

इंधन दरवाढीमुळे वाढत्या कराचा बोजा सामान्यांनवर पडत आहे. त्यावरुन राहुल गांधींनी टीका केली आहे.”तुमची गाडी पेट्रोल चालत असेल किंवा डिझेलवर, मोदी सरकार कर वसुलीवर चालते!,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेस पक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहे आणि ११ जून रोजी पक्षानेह त्याविरोधात देशव्यापी आंदोलनही केले होते.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढ

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३१ ते ३५ पैसे आणि डिझेलच्या दरात १५-२३ पैसे वाढ झाली आहे. आजच्या वाढीसह राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या पुढे गेली आहे. यासह, देशातील चार मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती याआधीच १०० च्या पुढ्या गेल्या आहेत. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.

मे महिन्यानंतर ३६ वेळा पेट्रोलच्या किंमतीत वाढ

५ राज्यांमधील निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा टप्पा मेपासून सुरू झाला, जो आतापर्यंत सुरू आहे. ४ मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत एकूण ३६ वेळा वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत ३४ वेळा वाढ झाली आहे. या वाढीमुळे इंधनाची किंमत आता देशातील बहुतेक पेट्रोल पंपांवर नव्या विक्रमावर पोहोचली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Whether your car runs on petrol or diesel modi government runs on tax collection rahul gandhi taunts the center on rising oil prices abn

ताज्या बातम्या