Premium

महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे ‘ते’ दोन खासदार कोण? विरोधाचं कारण काय? महाराष्ट्रातील नेत्याचाही समावेश

लोकसभेत बुधवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता या विधेयकावर मतदान घेण्यात आलं. यावेळी लोकसभेतील ४५४ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. तर दोन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.

Women Reservation Bill
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर. (PC : Sansad TV)

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पारित करण्यात आलं आहे. लोकसभा आणि देशातल्या सर्व राज्यांमधील विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारं बहुप्रतीक्षित विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. लोकसभेत बुधवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता या विधेयकावर मतदान घेण्यात आलं. यावेळी लोकसभेतील ४५४ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. तर, केवळ दोन खासदारांनी या आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे विधेयक लोकसभेत पारित करण्यात आल्याची घोषणा केली. दरम्यान, या विधेयकाला विरोध करणारे ते दोन खासदार कोण आहेत? त्यांनी या विधेयकाला विरोध का केला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला आरक्षण विधेयकाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाने विरोध केला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेतील चर्चेवेळी या विधेयकाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर त्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. तसेच एआयएमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनीही या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who are the 2 mps voted against womens reservation bill in lok sabha asc

First published on: 21-09-2023 at 11:52 IST
Next Story
Indians in Canada: “कॅनडातील हिंदू दहशतीच्या छायेखाली”, भारतावरील आरोपांनंतर कॅनडाच्या खासदाराचा दावा; म्हणाले, “खलिस्तानी…”