scorecardresearch

“चीनमध्ये करोना मृतांची आकडेवारी लपवली जातेय”; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर आरोप

टेड्रोस यांनी सर्व देशांना करोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी जाहीर करण्याचे आवाहनही केले आहे.

“चीनमध्ये करोना मृतांची आकडेवारी लपवली जातेय”; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर आरोप
फोटो – एएनआय वृत्तसंस्था

चीनने करोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी केला आहे. यामुळे जगभरात होणाऱ्या करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा स्पष्ट नसल्याचेही डब्लूएचओकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषद यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – “भारतातील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका”, १९ मृत्यूनंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

काय म्हणाले टेड्रोस अधानोम गेब्रेयसस?

गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेकडे ११ हजार ५०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी ४० टक्के रुग्ण अमेरिका, ३० टक्के रुग्ण युरोप आणि उर्वरित ३० टक्के रुग्ण पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील आहे. तसेच चीनने करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी नोंदवल्याने जगभरात झालेल्या करोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा स्पष्ट नाही, अशी माहिती टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी दिली आहे.

हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचा जॉन्सन अँड जॉन्सनला दिलासा, बेबी पावडरच्या उत्पादन आणि विक्रीस संमती

यावेळी बोलताना, टेड्रोस यांनी सर्वच देशांना करोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी जाहीर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, करोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी सर्वच देशांनी करोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी सार्वजनिक करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – जोशीमठमध्ये सध्या दोनच हॉटेल पाडणार; इतर घरांना तात्पुरता दिलासा

पुढे बोलताना ते म्हणाले, ”करोनाच्या XBB.1.5 या नवीन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सिक्वेन्सिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आम्ही सर्वच देशांना सिक्वेन्सिंग वाढवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे करोना रुग्णांची अचूक माहिती पुढे येणास मदत होईल.”

हेही वाचा – दक्षिण कोरियाच्या नागरिकांना चीनचा व्हिसा बंद; प्रवाशांच्या करोना चाचणी सक्तीला प्रत्युत्तर

दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यात चीनने करोना निर्बंध शिथील केले होते. मात्र, त्यानंतर जानेवारी महिन्यात चीनमध्ये पुन्हा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यापार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 09:02 IST

संबंधित बातम्या