अध्यात्मिक गुरु बागेश्वर बाबा हे त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात किंवा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादही होत असतात. बागेश्वर धाम सरकार असंही ते स्वतःला म्हणवतात. अशात आता त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. गुजरातमधल्या वडोदरा या ठिकाणी झालेल्या दिव्य दरबार प्रवचन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. वडोदरातल्या नवलाखी मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
काय म्हटलं आहे बागेश्वर बाबांनी
“दहा रुपयांच्या राजकारणासाठी कोट्यवधींचं अध्यात्म कोण सोडणार? ” असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्रींनी केलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांचं प्रवचन झाल्यानंतर मीडियाशी त्यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर बाबांनी हे उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांच्यासह भाजपाचे नेते विजय शाहही उपस्थित होते.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who did quit spirituality worth crores for politics worth rs 10 self styled guru dhirendra shastri scj