Dharmaraj Kashyap : बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला मुंबईत हत्या करण्यात आली. या प्रसंगी तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या चालवल्या. तीन पैकी दोन हल्लेखोरांना पोलिसांनी जिवाची बाजी लावून अटक केली. आता यातला धर्मराज कश्यप हा आरोपी लॉरेन्स बिश्नोईला आदर्श मानत असल्याची बाब समोर आली आहे. धर्मराज कश्यप ( Dharmaraj Kashyap ) हा २० वर्षांचा तरुण आहे. त्याने बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या. हा धर्मराज कश्यप कोण आहे आपण जाणून घेऊ.

कोण आहे धर्मराज कश्यप?

बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या धर्मराजने ( Dharmaraj Kashyap ) १० वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. उत्तर प्रदेशातल्या बहरईच या ठिकाणी असलेल्या शाळेत त्याने १० वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. या परीक्षेत त्याला ७८ टक्के गुण मिळाले होते. त्याच्या कुटुंबाला वाटत होतं की त्याने वैद्यकशास्त्रात शिक्षण घ्यावं पण धर्मराज लॉरेन्स बिश्नोईला त्याचा आदर्श समजतो. त्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळला. धर्मराजला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. ज्यामध्ये आता २६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

धर्मराज सध्या घाबरला आहे

धर्मराज ( Dharmaraj Kashyap ) सध्या घाबरला आहे. तसंच आपण चुकीच्या मार्गाने गेलो असं आता त्याला वाटतं आहे. पण एक काळ असाही होता की लॉरेन्स बिश्नोईला तो त्याचे आदर्श बनले होते. धर्मराज हा माझा लहान भाऊ आहे. पण त्याने जे केलं ते चांगलं नाही असं धर्मराजचा मोठा भाऊ अनुरागने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. धर्मराज ( Dharmaraj Kashyap ) हा पुण्याला गेला होता. त्याच्या बरोबर शिवकुमार गौतम होता. शिवकुमार हा बाबा सिद्दीकी प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे. त्यानेच हा कट रचल्याची शक्यता आहे. मात्र तो सध्या फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

धर्मराजचा भाऊ अनुरागने काय सांगितलं?

अनुरागने सांगितलं १२ ऑक्टोबरला धर्मराजने बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला दोन दिवसांपूर्वी आमच्या गावातल्या घरी आणण्यात आलं होतं. इथे तो कुणाला भेटला होता काय करत होता याची चौकशी पोलिसांनी केली. त्यासाठी त्याला आमच्या गावात आणलं होतं. त्यावेळी मी पोलिसांची परवानगी काढून धर्मराजशी बोललो होतो. धर्मराजने मला सांगितलं की अकोल्यातला शार्प शूटर शुभम लोणकर हा बिश्नोई गँगचा सदस्य आहे. त्याच्याशी माझी ओळख झाली होती. मी त्याच्या संपर्कात होतो त्याने इतरांनाही जमवलं होतं अशी माहिती मला धर्मराजने दिल्याचं अनुरागने सांगितलं.

Story img Loader