Who is Sunita Vishwanath: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुनीता विश्वनाथ कोण आहेत? असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला आहे. तसंच राहुल गांधी यांच्यासह त्या अमेरिका दौऱ्यात काय करत होत्या? असंही त्यांनी विचारला आहे. आपल्या अमेरिका दौऱ्यात सुनीता विश्वनाथ यांची भेट राहुल गांधींनी का घेतली होती? असाही प्रश्न स्मृती इराणींनी विचारलं आहे.
काय म्हटलं आहे स्मृती इराणींनी?
“सुनीता विश्वनाथ यांची भेट राहुल गांधी यांनी का घेतली होती? सुनीता विश्वनाथ यांचा भारत सरकारला अडचणीत आणण्यासाठी, भारत सरकार तोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, कट रचणाऱ्या जॉर्ज सोरस यांच्याशी काय संबंध आहे? याविषयी राहुल गांधी बोलतील का? असाही प्रश्न स्मृती इराणींनी विचारला आहे. भारताच्या लोकशाहीबाबत ज्यांची मतं चुकीची आहेत, जे भारताविषयी चांगली धोरणं ठेवत नाहीत अशा लोकांच्या संपर्कात राहुल गांधी का आहेत? काँग्रेस पक्ष याचं उत्तर देईल का ? ” असंही स्मृती इराणींनी म्हटलं आहे.
कोण आहेत सुनीता विश्वनाथ?
सुनीता विश्वनाथ हिंदू फॉर ह्यूमन राईट्च्या सह संस्थापक आहेत. सुनीता विश्वनाथ अफगाण विमेन फॉरवर्ड नावाच्या एनजीओच्याही संस्थापक आहेत. सुनीता विश्वनाथ या २०२० मध्ये ही वादांमध्ये अडकल्या होत्या. कोलंबिया विद्यापीठाने त्यांची नियुक्ती रिलिजियस लाइफ अॅडव्हायजर म्हणून करण्यात आली होती.
सुनीता विश्वनाथन यांचं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे?
सुनीता विश्वनाथन यांची दोन लग्नं झाली आहेत. त्यांच्या पहिल्या पतीचं नाव सुकेतू मेहता होतं. ते न्यूयॉर्क विद्यापीठात शिकवतात. तर सुनीता विश्वनाथन यांचं दुसरं लग्न स्टीफन शॉ यांच्याशी झालं आहे. शॉ हे ज्युईश व्हॉईस फॉर पीस या संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत.
