Who was Savitha Shan? अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ऑस्टिन या शहरात एका गोळीबाराच्या घटनेत भारतीय वंशाची २१ वर्षीय विद्यार्थिनी सविता शान ठार झाली आहे. ही घटना शहरातील प्रसिद्ध अशा 6th स्ट्रीट या ठिकाणी एका बिअर गार्डनच्या बाहेर घडली. या प्रकरणी आता तपास यंत्रणा तपास करत आहेत. हा दहशतवादी हल्ला नव्हता ना? हा पैलूही पोलीस तपासत आहे. इराणमध्ये युद्ध पेटलेलं असताना हा हल्ला झाला आहे त्यामुळे जगभरातला तणाव वाढला आहे.
गोळीबाराची घटना नेमकी काय?
रविवारी रात्री ऑस्टिनच्या 6th स्ट्रीट भागात बफोर्ड बॅकयार्ड बिअर गार्डनच्या बाहेर अचानक गोळीबार सुरु झाला.
ऑस्टिन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता शान तिथे उपस्थित होती. तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोराला उत्तरादाखल केलेल्या कारवाईत ठार केलं.
कोण होता तो हल्लेखोर?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराचं नाव डिआगा डिआग्ने असं आहे, तो सेनेगलचा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्लेखोराने पांढरा टी शर्ट घातला होता. त्यावर इराणचा झेंडा होता आणि प्रॉपर्टी ऑफ अल्लाह असं लिहिलं होतं. FBI चे कार्यवाहक विशेष एजंट अॅलेक्स डोरन म्हणाले की आम्हाला असे काही संकेत मिळाले आहेत ज्यामुळे हा दहशतवादी हल्ला असू शकतो अशी माहिती आहे. आम्ही त्या दृष्टीने तपास करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
