Why Supreme Court acquitted Surendra Koli for Nithari killings : सर्वोच्च न्यायालयाने निठारी हत्याकांड प्रकरणात सुरेंद्र कोली याची निर्दोष सुटका केली आहे. दरम्यान या प्रकरणात निर्णय देताना न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर तीव्र टीका केली आहे. पोलिसांनी निठारी हत्याकांडातील महत्त्वाच्या तपासाच्या दिशेकडे दुर्लक्ष केले, असे न्यायालयाने म्हटले.
कोली याची ज्या एकमेव प्रकरणात जन्मठेपेची शिक्ष अजूनही लागू होती त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आता त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. दुसऱ्या अनेक प्रकरणांमध्ये कोली आणि त्याचा सहआरोप मोहिंदर सिंह पंढेर यांना
त्याला आणि त्याचा सहआरोपी मोहिंदर सिंह पंढेर यांना यापूर्वीच इतर अनेक प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
सरन्यायाधीश बी. आर. गवई, न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाशी सहमती दर्शवली, तसेच खंडपीठीने नमूद केले आहे की, फक्त संशयाच्या आधारावर दोषी ठरवले जाऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा कोली याला संबंधित प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्त करण्यात आले आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
न्यायालयाने नमूद केले की आरोपी विरोधात परिस्थितीजन्य पुराव्यांना फॉरेन्सिक पुराव्याचे पाठबळ मिळाले नाही आणि मुख्य तपासाची दिशा, ज्यामध्ये अवयवांच्या व्यापाराशी संबंधीच्या पुरावे अशा महत्त्वाच्या तपासाच्या दिशेकडे दुर्लक्ष करण्यात आले. न्यायालाने असेही म्हटले की कोलीने दिलेला कथित कबुलीजबाब विसंबून न राहण्यासारखा आहे, कारण त्याला साठ दिवसांपेक्षा जास्त काळ कायदेशीर मदत किंवा वैद्यकीय तपासणी न घेता कोठडीत ठेवण्यात आले होते.
तसेच अंतिम निकालात खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, कोलीचा कबुलीजबाब नोंदवणाऱ्या ट्रायल मॅजिस्ट्रेटनी कोलीचा कोठडीत संभाव्य छळ झाल्याची शक्यता वर्तवल होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अनेक त्रुटींवर देखील बोट ठेवले होते, ज्यामध्ये गुन्हा घडले ते ठिकाण ताब्यात घेण्यास झालेला उशीर, विरोधाभास दर्शवणारे रिमांड आणि रिकव्हरी पेपर्स, वेळेवर वैद्यकीय तपासणी न करणे आणि अर्धवट फॉरेन्सिक डॉक्युमेंटेशन याचा समावेश होता.
तसेच खंडपीठाला पोलिसांच्या तपासात अनेक विसंगती आढळल्या होत्या. खंडपीठाने म्हटले की, “एक अर्धवट शिकलेला घरातील नोकर, ज्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण नाही तो शरीराचे अचूकपणे तुकडे कसे करू शकला,” हे पुराव्यावरून स्पष्ट होत नाही.
न्यायालयाने असेही म्हटले की, मोहिंदर पंढेरच्या नोएडा येथील डी-५ सेक्टर ३२ घराजवळ सापडलेले चाकू, कुऱ्हाडी आणि मानवी अवशेष यांचा कोलीशी न्यायालयात स्वीकारता येईल असा कोणताही संबंध आढळला नाही.
सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने महत्त्वाचे घरातील आणि परिसरातील साक्षीदारांची चौकशी न केल्याबद्दल किंवा मटेरियल लिड्सचा पाठपुरावा न केल्याबद्दल पोलिसांना फटकारले. त्यांनी असेही नमूद केले की फॉरेन्सिक विश्लेषणात दिसून आले की, घरात कथित गुन्ह्यांशी संबंधीत असे मानवी रक्ताचे डाग किंवा मानवी अवशेषआढळले नाहीत.
खंडपीठाने सेरेंद्र कोली याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. तो भयंकर सिरीयल किलिंग्जचे प्रकरण उजेडात आल्यापासून म्हणजेच २००६ पासून तुरूंगात बंद होता.
