सात जन्म तोच पती मिळावा म्हणून पत्नी वडाच्या झाडाला फेऱ्या मारते. पतीसाठी वेगवेगळे व्रत ठेवते, हे आपण पाहिलं आहे. पण, उत्तरप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने पतीच्या अंगावर ॲसिड फेकलं आहे. यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून, रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे ही घटना घडली आहे. डब्बू गुप्ता असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी डब्बू गुप्ताने पत्नी पूजाविरोधात कलेक्टरगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी पत्नीला अटक केली.
हेही वाचा : “महिला बॉसशी लैंगिक संबंध ठेवायला… “, गुगलच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
डब्बूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूजा रात्री १२.३० वाजता घरी आली. तेव्हा एवढ्या उशीरा कोठून आली, असं डब्बूने विचारलं. त्यावेळी पूजा डब्बूवर रागाला गेली आणि त्याला मारलं. यानंतर डब्बूनेही पूजाला मारलं. याच रागातून पूजा बाथरुममध्ये गेली आणि तेथील ॲसिड आणून डब्बूच्या अंगावर फेकलं.
हेही वाचा : निवडणूक ३३ जागांवर, मात्र सर्व ठिकाणी पक्षाने दिला एकच उमेदवार, वाचा पाकिस्तानमधील या अजब निवडणुकीबद्दल…
या हल्ल्यात डब्बूचा संपूर्ण चेहरा जळाला आहे. याप्रकरणी डब्बूने पत्नाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तिला न्यायालयात हजर करणात आहेत. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, डब्बू हा दारू सारखा दारू पित असतो.