संतापजनक! अनैतिक संबंधांबद्दल जाब विचारणाऱ्या पत्नीला पोलिसाकडून अमानुष मारहाण

तिला नवऱ्याने खेचत घराबाहेर आणलं, जमिनीवर आपटलं, व केसांना पकडून सर्वांसमक्ष पायातून चप्पल काढून बेदम मारहाण केली.

तिला नवऱ्याने खेचत घराबाहेर आणलं, जमिनीवर आपटलं, व केसांना पकडून सर्वांसमक्ष पायातून चप्पल काढून बेदम मारहाण केली. हे सर्व नवऱ्याने केल ते फक्त तिने त्याच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केला म्हणून. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडला आहे.

या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच हे कृत्य केलं आहे. विवाहबाह्य संबंधांना विरोध केला म्हणून गांधवानी पोलीस ठाण्याचे प्रमुख नरेंद्र सुर्यवंशी यांनी बायकोला अमानुष मारहाण केली.

मंगळवारीही घटना घडली.  काही लोकांसह पोलीसही तिथे होते. ते नरेंद्रला रोखण्याचे प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. या प्रकरणी नरेंद्र सुर्यवंशीची चौकशी सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wife unhappy with mp cops affair he attacks her dmp

ताज्या बातम्या