पुढील वर्षाच्या अखेरीस देशातील १०० रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सुविधा गुगलकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ सुंदर पिचई यांनी बुधवारी केली. नवी दिल्लीत आयोजित ‘गुगल इंडिया’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला पाठिंबा देत सुंदर पिचई यांनी ही घोषणा केली. याशिवाय हैदराबादमध्ये गुगलचे कॅम्पस उभारण्यात येणार असल्याचे पिचई यांनी यावळी सांगितले. या कॅम्पससाठी नव्या इंजिनिअर्सची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी भारत दौऱयावर आलेले सुंदर पिचई यांची भेट घेणार आहेत. तसेच काही केंद्रीय मंत्र्यांचीही पिचई भेट घेतील. यासोबतच दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांशी पिचई संवाद साधणार आहेत.