देशभरामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची थेट आसामच्या विधानसभेमध्येही चर्चा झाली. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मुस्लिमांच्या लोकसंख्येबद्दल भाष्य करताना या चित्रपटाचा संदर्भ दिला. मुख्यमंत्री राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणारं भाषण करत असताना या चित्रपटाचा संदर्भ देत मुस्लिमांना अल्पसंख्यांक म्हणता येणार नाही असं तर म्हणालेच शिवाय आसाममध्ये काश्मीरची पुनरावृत्ती होणार नाही याबद्दल मुस्लिमांनी इतरांच्या मनातील भीती घालवण्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असंही म्हटलंय.

आसामच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोकसंख्या ही मुस्लीम असल्याने त्यांना यापुढे राज्यामध्ये अल्पसंख्यांक म्हणून गृहित धरता येणार नाही, असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलंय. तसेच १९९० मध्ये काश्मीरमधील हिंदूंच्या ज्या हत्या झाल्या त्यासाठी मुस्लीम जबाबदार असल्याचं सांगत हेमंत बिस्वा शर्मा यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे आसामची अवस्था होईल अशी जी इतर समुदायांना भीती वाटतेय ती दूर करण्याचं ‘मुस्लिमांचं कर्तव्य आहे’ असं मत व्यक्त केलंय.

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान

नक्की वाचा >> ‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

काश्मीरमधून ज्या प्रकारे काश्मिरी पंडितांना त्यांची घरं सोडावी लागली त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी “जे काश्मिरी पंडितांचं झालं तेच आसाममधील लोकांबद्दल होईल का असं मला अनेकजण विचारतात. दहा वर्षानंतर आसाममध्येही अशीच परिस्थिती असेल का जशी आता बॉलिवूडमधील ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये दाखवण्यात आलीय? आमची भीती घालवं हे मुस्लिमांचं कर्तव्य आहे. मुस्लिमांनी बहुसंख्यांक असल्यासारखं वागलं पाहिजे आणि आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की इथे काश्मीरची पुनरावृत्ती होणार नाही,” असंही हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”

“आज मुस्लीम समाजातील लोक हे विरोधी पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत. त्यांना सत्तेमध्ये समान अधिकार मिळतोय. त्यामुळेच आदिवासी लोकांच्या हक्कांचं संरक्षण होईल आणि त्यांच्या हक्कावर गदा येणार नाही याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. आदिवासींच्या सहाव्या प्रतिबंधित जमीनींवर अतिक्रमण करण्याची काहीच गरज नाहीय. जर बोरा आणि कलिता (आसामी) त्या जमिनींवर स्थायिक झालेले नाहीत तर इस्लाम आणि रहमान (मुस्लीम अडनावं) यांनी सुद्धा त्या जमिनींवर वास्तव्य करु नये,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “मी ‘गुजरात फाइल्स’ बनवायला तयार, सत्य मांडणार पण तुम्ही आश्वासन द्या की…”; दिग्दर्शकाची मोदींकडे मागणी

तसेच “जेव्हा आपल्याकडे सत्ता येते तेव्हा जबाबदारीही येते,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यामधील लोकसंख्येच्या ३५ टक्के लोक मुस्लीम असून त्यांनी येथील अल्पसंख्यांकांच्या हितांचं रक्षण करणं हे कर्तव्य मानलं पाहिजे, असंही म्हटलंय.

“आसममधील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहे. आपली संस्कृती आणि राहणीमानासंदर्भातील भीती त्यांना वाटतेय. सौदार्य हे दुहेरी असलं पाहिजे. मुस्लिमांनाही संस्कारी, क्षत्रिय संस्कृतीच्या संरक्षणाबद्दल बोललं तर सौदार्य टिकून राहिलं. दहा वर्षांपूर्वी आम्ही अल्पसंख्यांक नव्हतो पण आज आहोत,” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

हेमंत बिस्वा शर्मा आणि आसामच्या संपूर्ण मंत्रीमंडळाने सोमवारी हा चित्रपट थेअटरमध्ये जाऊन पाहिला. यासंदर्भातील पोस्टही त्यांनी केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी काश्मीरमधील पंडितांचं हत्याकांड हे मानवतेला मोठा धक्का होता असं हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलेलं.

नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”

भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वादावर मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली. ‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा आरोप मोदींनी केला.

नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?

काश्मीर खोऱ्यमतून १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले. ‘हा चित्रपट काश्मिरी पंडितांबाबत कित्येक वर्षे जाणीपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो. मात्र, या चित्रपटाची बदनामी केली जात आहे. एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा वा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा’, असे मत मोदी यांनी भाजपाच्या खासदारांसमोर मांडले.

कुठलाही सिनेमा चांगला की, वाईट याची नीट समीक्षा केली पाहिजे पण, त्याऐवजी या चित्रपटाविषयी शंका-कुशंका घेतल्या जात असून हे कट-कारस्थान आहे. कुठल्याही विषयावर योग्य मार्गाने सत्याची मांडणी झाली पाहिजे. त्यामुळे चिंता फक्त या चित्रपटाबद्दल नाही. देशाच्या भल्यासाठी सत्य मांडले पाहिजे. संबधित विषयातील एक बाजू एखाद्याला महत्त्वाची वाटू शकते, दुसऱ्याला अन्य एखादी बाजू महत्त्वाची वाटेल. हा चित्रपटातून सत्य मांडले जात असेल तर त्याला विरोध कशासाठी केला जात आहे, असा सवाल मोदींनी केला.

नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”

पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना आर्थिक व लष्करी मदत पुरवली गेली. दहशतवाद्यांनी अनेक काश्मिरी पंडितांची हत्या केली. या हत्यासत्रानंतर काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पलायन करावे लागले होते. विस्थापित झालेले काश्मिरी पंडित अजूनही खोऱ्यात परत येऊ शकलेले नाहीत. हे सत्य ज्यांना दडपून टाकायचे आहे, तेच या चित्रपटाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.