“जीभ कापून टाकू”; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत खोटे बोलत आहे, असेही चंद्रशेखर राव म्हणाले.

Will Cut Your Tongue KCR Warning To Telangana BJP Chief
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (PTI photo)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांच्यावर कडाडून टीका केली आणि राज्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आश्वासन फसवे असल्याचे म्हटले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना आमच्याबद्दल अनावश्यक टिप्पण्या टाळा नाहीतर जीभ कापून टाकू, असा इशाराही दिला. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असेही केसीआर म्हणाले.

“”मी थेट संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना खरेदी केलेला तांदूळ घेण्यास सांगितले. ते म्हणाले की मी निर्णय घेईन आणि मला सांगेन. पण आजपर्यंत मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. तेलंगणा राज्यात गेल्या वर्षीपासून आतापर्यंत सुमारे ५ लाख टन धान्य पडून आहे. केंद्र ते विकत घेत नाही, असे के चंद्रशेखर राव म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्षांवर आक्रमक भूमिका घेत केसीआर म्हणाले, “केंद्र म्हणत आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि राज्यात भाजपा म्हणत आहे की ते खरेदी करेल. तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात तर आम्ही तुमच्या (राज्यातील भाजपा नेत्यांच्या) जीभ कापून टाकू.”

बंदी संजय संजय म्हणाले होते की ते मला तुरुंगात पाठवणार आहेत. मी त्यांना मला स्पर्श करण्याचे आव्हान देतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना केसीआर म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत.“शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधक राजकारण करुन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी केंद्राविरोधात आंदोलन करणार आहे,” असे चंद्रशेखर राव म्हणाले.

केसीआर यांनी केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर मागे घेण्यासही सांगितले. “केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत खोटे बोलत आहे. २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत १०५ डॉलर होती ती आता ८३ डॉलरवर आली आहे. परदेशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचे भाजाप जनतेसोबच खोटे बोलत आहे,” असे चंद्रशेखर राव म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Will cut your tongue kcr warning to telangana bjp chief abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या