लोकसभेच्या २२ जागा जिंकल्या तर कर्नाटकात २४ तासांच्या आत भाजपाचे सरकार: येडियुरप्पा

एअर स्ट्राइकमुळे भाजपाला कर्नाटकात २२ जागा मिळतील, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता.

कर्नाटकात २२ जागा जिंकल्यास राज्यात भाजपाचे सरकार २४ तासांच्या आत सत्तेवर येईल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुरप्पा यांनी केला आहे. यारागट्टी गावात आयोजित एका सभेत ते बोलत होते.

कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा आहेत. सध्या राज्यात भाजपाकडे १६, काँग्रेस १० आणि जेडीएसकडे २ जागा आहेत. यापूर्वीही येडियुरप्पा यांनी भारतीय वायू सेनेने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमुळे भाजपाला कर्नाटकात २२ जागा मिळतील असे म्हटले होते. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट करण्याच्या कृतीमुळे देशात मोदींच्या समर्थनाची लाट आली आहे. त्याचा आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. यामुळे युवकांमध्ये उत्साह संचारला आहे. यामुळे कर्नाटकात पक्षाला २२ जागा मिळण्यास मदत होईल, असे म्हटले होते.

मे २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर लगेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना राज्य विधानसभेत १११ हा बहुमताचा आकडा गाठण्यास अपयश आले होते. कर्नाटक विधानसीाा निवडणुकीत भाजपाने १०४ जागा जिंकल्या होत्या. तर जेडीएसने ३७ आणि काँग्रेसने ८० जागा पटकावल्या होत्या. राज्यात सध्या काँग्रेस-जेडीएसचे आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Will form govt in karnataka within 24 hours if we win 22 lok sabha seats says bs yeddyurappa

ताज्या बातम्या