उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असून पंजाब व हरयाणात तापमान तीन अंश सेल्सिअस इतके होते. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. काही भागांत १ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद केली गेल्याचे हवामान खात्यातील सूत्रांनी म्हटले आहे. अमृतसर येथे सोमवारी २.८ तर पटियाला येथे ५.६ इतक्या तापमानाची नोंद केली गेली. अंबाला येथे ६.१ तर लुधियाना ६.२, हिसार येथे ६.५ आणि चंदिगड येथे ६.६ इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली. पंजाब, हरयाणातील बहुतांश भागांवर दिवसभर धुक्याचा जोर कायम होता. त्यामुळे रेल्वे, विमानसेवा तसेच रस्ता वाहतुकीला याचा जबर फटका बसला. पुढील २४ तासांत तापमानात अधिक घट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.