भारत-अमेरिका अणुकरारावरून सात वर्षांपूर्वी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढला होता. चुकीच्या वेळी हा निर्णय घेतला गेला तसेच निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी अपयश आल्याचे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मान्य केले. अणुकराराला विरोध करण्याची पक्षाची भूमिका योग्य होती असे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. अणुकराराराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, मात्र अमेरिकेचा मोठा दबाव आल्याचा दावा येचुरी यांनी केला. अमेरिकेच्या साम्राज्यवादाशी जवळीक करणे पक्षाला मान्य नाही. मात्र या मुद्दय़ावर निवडणुकीच्या कालावधीत आम्हाला जनमत संघटित करता आले नाही हे येचुरी यांनी मान्य केले.