गेल्या महिन्यात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले गोव्यातील काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅलेक्झिओ लॉरेन्को यांनी महिनाभरातच रविवारी या पक्षाचा राजीनामा दिला. ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे़  लॉरेन्को यांना कुर्तोरिम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर चार दिवसांतच, म्हणजे २० डिसेंबरला त्यांनी पक्षत्याग केला होता़  त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी माजी मंत्री मायकेल लोबो यांनी लॉरेन्को यांना काँग्रेसमध्ये परत येण्याचे निमंत्रण दिले. उत्तर गोव्याच्या बार्देझ तालुक्यातील बडे प्रस्थ असलेल्या लोबो यांनी भाजप सोडून ११ जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गोव्याच्या राजकीय स्पर्धेत प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसने आतापर्यंत ३ विद्यमान आमदारांना पक्षात सामावून घेतले आहे. यापैकी दोघांनी काँग्रेसचा, तर एकाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Within a month the former mla left for trinamool akp
First published on: 17-01-2022 at 00:55 IST