अवघ्या सोळा महिन्यांत नवीन अवकाशयान

लॉस एंजल्स पासून १६० कि.मी. अंतरावर मोजावे अँड स्पेस पोर्ट येथे त्यांनी हे यान प्रदर्शित केले.

व्हर्जिन अ‍ॅटलांटिकचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांचा उपक्रम

व्हर्जिन अ‍ॅटलांटिकचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी नवी प्रवासी अवकाशयान तयार केले असून ते ‘मोजावे’ वाळवंटात आधीचे यान अपयशी ठरल्यानंतर अवघ्या सोळा महिन्यांत तयार केले आहे. व्हर्जिन स्पेस शिप युनिटी असे त्याचे नामकरण करण्यात आले असून ब्रॅनसन हे अवकाश स्पर्धेत पुन्हा उतरले आहेत. साहसी अवकाश प्रवासाच्या उद्योगात असलेल्या उद्योगपतींना त्यांनी शह दिला असून अगदी कमी काळात पुन्हा अवकाशयान तयार केले आहे. लॉस एंजल्स पासून १६० कि.मी. अंतरावर मोजावे अँड स्पेस पोर्ट येथे त्यांनी हे यान प्रदर्शित केले.

जेव्हा या अवकाशयानाकडे पाहिले तेव्हा माझा कंठ दाटू आला व डोळ्यात अश्रू तरळले. यानाला चमकदार पांढरा रंग असून मागच्या भागात करडा व काळा रंग वापरला आहे. त्यावर एक निळ्या रंगाची प्रतिमा असून तो प्रख्यात ब्रिटिश वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचा डोळा आहे. ब्रॅनसन यांनी हॉकिंग यांना अवकाशात नेण्याची तयारी दर्शवली असून सध्या हॉकिंग व्हीलचेअरवर असतात त्यामुळे त्यांना ते कठीण आहे. हॉकिंग यांनीच अवकाशयानाचे नाव युनिटी ठेवण्याची सूचना केली होती. आपले अवकाश प्रवासाचे स्वप्न कायम आहे, असे हॉकिंग यांनी ध्वनिमुद्रित संदेशात म्हटले आहे. रिचर्डने मला नेले व मी ते करू शकलो तर चांगलेच आहे, त्याचा अभिमान वाटेल असे ते म्हणतात. हे यान ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी अपयशी ठरलेल्या यानासारखेच आहे.पायलटच्या चुकीने ते कोसळले होते. आताच्या यानात वैमानिकाला शेपटाकडील भागावर नियंत्रण करण्याची सुविधा दिली आहे, असे गॅलॅक्टिकचे मुख्य कार्यकारी जॉर्ज व्हाइटशेड यांनी सांगितले. दोन पायलट, सहा प्रवासी यांना घेऊन हे यान पृथ्वीच्या वर १०० कि.मी. उंचीवर जाते. ७०० जणांनी अंतराळ प्रवासासाठी नावे नोंदवली असून त्याचे १७.१७ कोटी रुपये कंपनीने घेतले आहेत. एलन मस्क यांची स्पेसएक्स, जेफ बेझॉस यांची ब्लू ओरिजिन, पॉल अ‍ॅलेन यांची स्ट्रॅटोलाँच सिस्टीम व बोइंग या कंपन्या अवकाश पर्यटनाच्या क्षेत्रात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Within sixteen months of the new space shuttle launch

ताज्या बातम्या