चालत्या गाडीत आईसह तिच्या ६ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पीडितांना रस्त्यात सोडून आरोपी फरार

घटनेनंतर पीडितांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे.

rape-accused
उत्तराखंडात चालत्या गाडीत आई, मुलीवर बालात्कार

हरिद्वारच्या रुरकी येथे चालत्या कारमध्ये महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपींनी या दोघींना आपल्या कारमध्ये बसवले आणि त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केला. घटनेनंतर पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

हेही वाचा – गर्भपात – भारतातील कायदेशीर स्थिती अमेरिकेपेक्षा उत्तम

घटनेनंतर आरोपी फरार
पीडिता आपल्या ६ वर्षीय मुलीसोबत रात्रीच्या वेळी पिरान कालियार या मुस्लिम धार्मिक स्थळावरून घरी जात होती. त्यावेळी कार मधून चाललेल्या सोनू नावाच्या व्यक्तीने तिला घरी सोडतो असं सांगितले. कारमध्ये आरोपीसोबत त्याचे मित्रही बसले होते. लिप्ट्च्या बहाण्याने आरोपींनी पीडितेला कारमध्ये बसवले आणि चालत्या कारमध्ये पीडितेसोबतच तिच्या ६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी पीडिता आणि तिच्या मुलीला रस्त्यात सोडून फरार झाले.

हेही वाचा- आणीबाणीत लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न ; पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका

पोलिसांकडून शोध सुरु
घटनेनंतर पीडिता मध्यऱात्री पोलीस स्टेशमध्ये दाखल झाली आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. मात्र, कारमध्ये नेमकी किती लोकं होते हे पीडितेच्या लक्षात नसल्याचे उत्तराखंड पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. पीडिता आणि तिच्या ६ वर्षीय मुलीला उपचारासाठी रुरकी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman and 6 year old daughter gangraped in moving car uttarakhand dpj

Next Story
Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी