रागाच्या भरात लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळलं; महिलेला अटक

एका महिलेनं तिच्या लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

delhi-police-crack-murder-case-arrests-7-with-help-of-tattoo-on-rotting-body-gst-97
(प्रातिनिधीक छायाचित्र)

एका महिलेनं तिच्या लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फरिदाबादमध्ये ही घटना घडली आहे. महिलेनं पेट्रोल टाकून मृताला जिवंत जाळलं होतं. पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. आरोपी महिला आणि मृत व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत १६ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या भावाने बल्लभगढ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत त्याच्या भावाने सांगितलं, की १६ ऑक्टोबरला सकाळी त्याचा भाऊ कामासाठी बाहेर गेला होता आणि तो परत आला नाही. त्यामुळे त्याने त्याच्या भावाच्या एका मैत्रिणीशी संपर्क साधला. तिने मृत त्याच दिवशी तिच्या घरी आला होता परंतु त्याची कार आणि लॅपटॉप तिच्या घरी ठेवून निघून गेला, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी एका निर्जन ठिकाणी बेपत्ता व्यक्तीचा अर्धा जळालेला मृतदेह पोलिसांना सापडला.

 “१६ ऑक्टोबरला रात्री पीडितेने तिच्या लिव्ह-इन पार्टनरलला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि ऑटोमध्ये बसवून एका निर्जन भागात नेले. तिथे त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले. तसेच मृत आणि आरोपी दोघे २०१९ मध्ये भेटले होते आणि काही काळाने सोबत राहू लागले. दरम्यान, महिलेला आधीच्या लग्नापासून एक मुलगी आहे. अलिकडेच मृताने तिच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर या जोडप्यात भांडण झाले होते. यामुळे रागात असलेल्या महिलेनं पार्टनरच्या हत्येचा कट रचला होता,” असे तपासात आढळल्याचे फरिदाबाद पोलिसांचे प्रवक्ते सुबे सिंग यांनी सांगितले. प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman burns live in partner in faridabad hrc

ताज्या बातम्या